बेस्टचा कारभार श्रीनिवासन यांच्याकडे

गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असलेल्या बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त पदभार धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे विशेष कार्य अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांच्याकडे सोपवला आहे. आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला सध्या पूर्णवेळ महाव्यवस्थापक नाही. या आधी तीन महाव्यवस्थापकांच्या नियुक्त्या झाल्या. मात्र ते फार काळ बेस्टचा कारभार पाहू शकले नाहीत. आता दीड महिने रिक्त असलेल्या महाव्यवस्थापकपदाचा श्रीनिवासन यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.