धाराशिवचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप कॉलवरून ही धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कॉलमधून त्यांना शिवीगाळ देखील करण्यात आली आहे.