
उपमख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर होते. यावेळी अजित पवार गटाचे स्थानिक आमदार, नेते, पदाधिकारी उपस्थित होते. मात्र माजी मंत्री धनंजय मुंडे यावेळी गैरहजर होते. आजारपणाचं कारण सांगून त्यांनी अजित पवार यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली. एवढेच नव्हे तर अजित पवार बीडच्या दौऱ्यावर असताना धनंजय मुंडे यांनी मुंबई गाठत थेट ‘फॅशन शो’ला हजेरी लावली आहे.
अजित पवार यांच्या दौऱ्यावेळी गैरहजर राहिल्याबाबत धनंजय मुंडे यांनी X वर एक पोस्ट करत कारणही सांगितलं आहे. X वर पोस्ट करत ते म्हणाले आहेत की, “उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या आजच्या बीड मधील नियोजित दौऱ्यात मी पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो. परंतु, माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही.”
अजित पवार बीडमध्ये, धनंजय मुंडे फॅशन शोमध्ये; आजारपणाचं कारण सांगून मारली दांडी pic.twitter.com/G0NHDLbQkX
— Saamana Online (@SaamanaOnline) April 2, 2025