धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या, अंजली दमानिया यांची मागणी

धनंजय मुंडे यांचा ताबडतोब राजीनामा घ्या, अशी मागणी सामाजिक कार्यकता अंजली दमानिया यांनी केली आहे. वाल्मीक कराड डायरेक्टर असलेल्या कंपनीत मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांची पत्नी हे संहार होल्डर होते, असा दावा दमानिया यांनी केला आहे. त्यांनी X वर एक पोस्ट करत हा दावा केला आहे.

X वर केलेल्या पोस्टमध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत अंजली दमानिया म्हणाल्या की, ”वेंकटरश्वर इंडस्ट्रियल सरव्हिसेस नावाच्या कंपनीचे मेजोरिटी शेयरहोल्डर धनंजय मुंडे व राजश्री धनंजय मुंडे आहेत. यात आधी वाल्मीक कराड डायरेक्टर होते, आजही ते शेयरहोल्डर आहेत. ही कंपनी fly ash विकते?”

त्या पुढे म्हणाल्या की, महागेंको (Mahagenco) ही कंपनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पूर्ण मालकीची उपकंपनी (Wholly owned subsidiary) आहे, असे असताना एक मंत्री त्या कंपनीतून आर्थिक लाभ कसा मिळवू शकतो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, ”मी त्यांच्या कंपनीचे परिशिष्टच (Annexures) मी खाली जोडत आहे, ज्यावर धनंजय मुंडे व राजश्री मुंडे यांची सही देखील आहे.”