
महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बीड ( Beed) जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता मोठी माहिती समोर येत आहे. या घटनेचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांनी पीएच्या हाताने राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे.
दोन महिन्यापूर्वी फडणवीसांकडे फोटो आले, तुम्हाला झोपा कशा लागल्या? रोहीत पवार यांची टीका