धनंजय मुंडेंना भेट दिल्याने महंत नामदेव शास्त्री बदनाम झाले; सारंगी महाजन यांची प्रतिक्रिया

बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे वादात सापडले आहेत. धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी भगवान गडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली होती. या भेटीवरून आता धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी टीका केली आहे. धनंजय मुंडेंना भेट दिल्याने महंत नामदेव शास्त्रीही बदनाम झाले, असे सारंग महाजन म्हणाल्या.

जेव्ह तो (धनंजय मुंडे) नामदेव शास्त्रींना भेटायला गेला होता, त्यावेळेलाच नामदेव शास्त्रांनी त्याला अडवायला पाहिजे होतं. (धनंजय मुंडे) याला त्यांनी सांगायला हवं होतं की तुझा वाद मिटला की तू भेटायला ये. हा (धनंजय मुंडे) जिथे-जिथे जाईल ना तिथे-तिथे चांगले लोक सुद्धा बदनाम होतील. यामुळे (धनंजय मुंडे) याला किती महत्त्व द्यायचं हे त्याच्या आजू-बाजूच्या लोकांनीच ठरवलं पाहिजे, असे सारंगी महाजन म्हणाल्या.

धनंजय मुंडे यांना भेट दिल्याने आता महंत नामदेव शास्त्रीही बदनाम झालेत. आम्हालाही हे योग्य वाटत नाही. नामदेव शास्त्री चांगले व्यक्ती होते. अजूनही आहेत. पण त्यांच्यावर आता एक डाग लागला आहे, असे सारंगी महाजन म्हणाल्या.