
हे असले बॉस? इन्स्टाग्रामवर अशी रील्स दाखवल्यावर नवी पिढी यातून काय प्रेरणा घेणार? अशी कॅप्शन देत मंत्री धनंजय मुंडे यांचा हातात पिस्तूल असलेला एक फोटो अंजली दमानिया यांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. कष्ट न करता पिस्तूल दाखवून पैसे कमावणं सोपं असंच त्यांना वाटतं. आपला देश असा असणार आहे का? देशाबद्दल हे व्हिजन असणार आहे का? ताबडतोब बीडमधील सगळय़ा शस्त्र परवान्यांवर चौकशी लावा. गरज नसलेले परवाने रद्द करा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी पोस्टमध्ये केली आहे.