मंत्र्यावर आरोप झाल्यास प्रथम त्याने राजीनामा दिला पाहिजे! अखेर अण्णा बोलले…

anna-hazare

सरपंच हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रोज नवनवीन आरोप होत असून कृषी मंत्री असताना केलेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणेही पुढे येत आहेत. दुसरीकडे विद्यमान कृषी मंत्री माणिक कोकाटे यांना शासनाची फसवणूक करून सदनिका घेतल्या प्रकरणी न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यावर आरोप झाल्यास त्याने सर्वप्रथम राजीनामा दिला पाहिजे, असा मोलाचा सल्ला दिला आहे.

मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यावर आरोप झाल्यास जबाबदारी म्हणून पहिले त्याने राजीनामा दिला पाहिजे. त्याने त्या व्यक्तीची इमेज वाढते आणि सरकारवरही परिणाम होत नाही. कारण जनता हे आपल्याला बघून अनुकरण करत असते. तुम्हीच जर वाट सोडून चालला तर जनता कुठे जाणार… त्यामुळे अशा लोकांना मंत्रिमंडळात घेण्याआधी विचार करणे गरजेचे असल्याचे अण्णा हजारे म्हणाले. माझे वय 90 वर्ष झाले, या वयात एकसुद्धा डाग नाही. तसेच जीवन मंत्रिमंडळातील लोकांनी जगले पाहिजे, असेही अण्णा हजारे अहिल्यानगर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.