धनंजय मुंडेंनाही आत टाका, सरकारी जेवण जेवू द्या; मामी सारंगी महाजन यांची मागणी

धनंजय मुंडे यांनाही आत टाका, सरकारी जेवण जेवू द्या, अशी मागणी मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी आमदारकीचाही राजीनामा द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. लोकांच्या मनातली दहशत मिटवण्याचा प्रयत्न करा, असं त्या म्हणाल्या. माध्यमांशी संवाद साधताना त्या असं म्हणाल्या आहेत.

काय म्हणाल्या सारंगी महाजन?

सारंगी महाजन म्हणाल्या की, ”धनंजय यालाही आता आत टाका, थोडे दिवस त्याला बसू द्या, हवा खाऊ द्या, सरकारी जेवण जेवू द्या. बीड जिल्ह्याचं तो नेतृत्व करतोय, मग त्याने नैतिक जबाबदारी समजून पहिल्याच दिवशी राजीनामा द्यायला हवा होता. अजूनही वेळ गेली नाही, तो राजीनामा देऊ शकतो. त्याने स्वतःहून आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यायला हवा.”

त्या पुढे म्हणाल्या की, ”वाल्मीक कराडची दहशत लोकांच्या मनात बसली आहे, ती मिठवण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे याने करावा, हा सल्ला मी त्याला देईल. सध्या त्याचं हेलीकॉप्टर – विमान हवेत आहे, ते उतरवण्यासाठी बीडची सामान्य जनता मदत करेल.”