
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला अडीच महिने झाले तरी अद्याप मुख्य आरोपींपैकी एक असलेला कृष्णा आंधळे हा अद्यापहे फरार आहे. आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, यासाठी धनंजय देशमुख यांनी मस्साजोग येथे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. यावेळी त्यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर मस्साजोग येथे आले होते. आरोपींना मदत करणाऱ्यांना अटक करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना संदीप क्षीरसागर म्हणाले की, ”आधीची काही प्रकरणं पहिली तर, पोलिसांच्या तपास जर तो (कृष्णा आंधळे) माणूस जिवंत असेल तर, तो सापडेल. मात्र जर तो माणूस नसेलच तर तो कसा सापडणार.” ते म्हणाले, ”महाराष्ट्राच्या इतिहासातील हे पहिलं प्रकरणं आहे, ज्या प्रकरणी सर्वपक्षीय नेते जात्यावर सभागृहात बोलले.”
दरम्यान, धनंजय देशमुख यांनी आंदोलन सुरु केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना फोन करून आंदोलनाला पाठींबा दिला. तसेच सुळे यांनी धनंजय देशमुख यांना ब्येतीची काळजी घेण्याची विनंती केली.