
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबात येथील देवगिरी किल्ल्याजवळ मंगळवारी वणवा पेटला होता. त्यानंतर इंटॅक, छत्रपती संभाजीनगर चॅप्टर, संभाजीनगर प्लॉगर्स आणि लोकसंवाद फाउंडेशन या तीन संस्थांचे प्रतिनिधी आणि इतिहासप्रेमी मिळून 65 जणांनी देवगिरी स्वच्छतेच्या मोहिमेत सहभाग घेतला. सात वर्षाच्या मुलापासून 70 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठांपर्यंत लोक यात सहभागी झाले होते. सकाळी 6 ते 9.30 या तीन तासांत 22 गोणी कचरा गोळा करण्यात आला.
संकेत कुलकर्णी यांनी या आयोजनामागचा हेतू सांगून प्रस्तावना केली. बारादरी मध्ये झालेले नुकसान दाखवले. इतिहास आणि तिथल्या इमारतींची माहिती दिली. कुठे किती कसे नुकसान झाले याबद्दल सांगितले. सर्वात वरच्या जनार्दन स्वामी समाधी पासून खालपर्यंत कचरा वेचण्यात आला.
मानद वन्यजीव संरक्षक डॉ. किशोर पाठक यांनी किल्ल्यातील जैवविविधतेच्या हानीबद्दल माहिती दिली.
इंटॅकच्या छत्रपती संभाजीनगर चॅप्टरचे माजी समन्वयक आर्किटेक्ट दिलीप सारडा, प्रा. अमित देशपांडे, सौरभ जामकर, बागेश्री देसाई, हृषीकेश होशिंग, आदित्य वाघमारे, डॉ. रश्मी बोरीकर, शिरीष तांबे, संभाजीनगर प्लॉगर्सचे समन्वयक निखिल खंडेलवाल, अभिषेक कादी, आदित्य पिलदे, किरण वनारे, ॲड. सोहम खांबेटे, वैदेही जोशी, ॲड. शिवम पांडे, चिन्मय कुलकर्णी, किरण जाधव, लोकसंवाद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. राजेश करपे, प्रा. हरिदास सोमवंशी, प्रा. उमाकांत राठोड, प्रा. मोहन निकम आदी उपस्थित होते.
सगळ्या 22 गोण्या पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सोपवल्या. त्यांनी ग्रामपंचायतीची घंटागाडी बोलावून सगळ्या गोण्या त्यांच्या हवाली केल्या. या कचऱ्यात मुख्यतः पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, चिप्सची पाकिट, सिगारेटचे रिकामे खोके, गुटख्याची पाकिटे आणि काही गोष्टींचा समावेश होता.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबात येथील देवगिरी किल्ल्याजवळ मंगळवारी वणवा पेटला होता.
किल्ल्याच्या चारही बाजूने ही आग लागली होती आणि यात किल्ल्याचा परिसर जळून खाक झाला होता. देवगिरी किल्ल्यालाही या आगीची झळ पोहोचली होती.
या वणव्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील इटॅक छत्रपती संभाजीनगर चॅप्टर, संभाजीनगर प्लॉगर्स आणि लोकसंवाद फाउंडेशन यांच्यासह दुर्गप्रेमींनी देवगिरी किल्ल्यावर पोहोचत साफसफाई केली.
देवगिरी किल्ल्यावर प्लास्टिकच्या बाटल्या, चिप्स, खाऊची पाकिट, तुटलेल्या चपला, शूज याचा मोठा कचरा जमा करण्यात आला.
अजूनही किल्ल्यावर काही प्रमाणात कचरा आणि स्वच्छतेची गरज आहे. पुरातत्व विभाग काहीतरी करेलच, पण इतिहासाचा उजाळा देत दुर्गप्रेमींनीही मोठ्या प्रमाणात किल्ल्यावर पोहोचावे असे आवाहन करण्यात आले आहे.
वणव्याच्या घटनेनंतर दुर्गप्रेमींनी केली देवगिरी किल्ल्याची साफसफाई! pic.twitter.com/5d7dhCddnM
— Saamana Online (@SaamanaOnline) April 13, 2025
Beta feature
Beta feature