Devgad News : आरे नरेवाडी येथील नुकसानग्रस्त कुटुबीयांच्या मदतीसाठी युवा सेना सरसावली

राज्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे नागरिकांचे नुकसान सुद्धा झाले आहे. कोकणात सुद्धा पावसाने चांगला जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी देवगड तालुक्यातील नरेवाडी येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडला होता. या पावसामुळे भरड गावातील चार कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.

आरे नरेवाडी येथे झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे भरड गावातील चार कुटुंबीयांच्या घराचे पत्रे उडून गेले तसेच कौल सुद्धा फुटली होती. या दुर्घटनेत जवळपास लाखो रुपयांचे नुकसान झाले. या कुटुंबीयांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन नुकसान झाल्याची माहिती घेतली व युवासेनेच्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, आरेगावचे शाखाप्रमुख विलास मालंडकरक, देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, उप तालुका प्रमुख रविंद्र जोगल, महाविकासस आघाडीचे काँग्रेसचे युवा जिल्हा अध्यक्ष किरण टेबुलकर, देवगड तालुका अध्यक्ष उमेश कुलकर्णी, उपाध्यक्ष तुषार भाबल, युवा सेना तालुका प्रमुख गणेश गावकर आणि युवकर काँग्रेस अध्यक्ष सूरज घाडी उपस्थित होते.