कॅबिनेट बैठकीपूर्वीच अजेंडा छापला; मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप, मंत्र्यांना कारवाईचा इशारा

महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश मंत्रीच धाब्यावर बसवत असल्याचे समोर आले आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांनी माध्यमांसमोर याबाबत उघड बोलून थेट मंत्र्यांनाच कारवाईचा इशारा दिला आहे. कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कॅबिनेट व्हायच्या आधीच काही लोक अजेंडा छापताहेत. ही चुकीची पद्धत आहे. मंत्र्यांनाही सांगितलं आहे की, आपल्या कार्यालयांना सांगा अन्यथा मला कारवाई करावी लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. कॅबिनेटचा अजेंडा हा पूर्णपणे गोपनिय असतो. त्याची शपथ आपण घेतलेली आहे. यातून काही लपवण्या सारखं काही नाही. पण नियम पाळले पाहिजेत. त्यामुळे माध्यमांनाही विनंती आहे. त्यांनी नियम मोडू नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.