बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून सत्ताधारी पाठ थोपटून घेत आहेत. भाजपने तर आज मुंबईभर ’बदला पुरा’ अशी पोस्टर लावली. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हातात रिवॉल्व्हर घेतलेला फोटो लावण्यात आला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला. आम्हाला बंदुका दाखवल्या तर आम्ही संविधान दाखवू असे त्या म्हणाल्या. गृहमंत्र्याचे असे फोटो लागणे धक्कादायक आहे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.