मुख्यमंत्र्यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर, पुण्यातील रुग्णाला पाच लाखांची मदत

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची पहिली बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीपूर्वी फडणवीस यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता मदत निधीच्या फाईलवर केली.

पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱहाडे यांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. चंद्रकांत कुऱहाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.