
देवेंद्र फडणवीस हे ‘संपवासंपवी’ खात्याचे मंत्री आहेत. त्यांना मराठय़ांना संपवायचे आहे. राज्य सरकारला मराठय़ांना आरक्षण द्यायचेच नाही. त्यामुळेच वेगवेगळे खेळ चालू आहेत, असे नमूद करताना ‘लाडकी बहीण’ योजना हा सावकारी खेळ आहे. मते विकत घेण्यासाठी ही योजना आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.