
प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याऐवजी आता पूर्वीप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली बसवली जाणार आहे. यामुळे ग्राहकांना दिवसा वीज वापरामध्ये 10 टक्के वीज बिलात सूट मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधान परिषदेत विक्रम काळे यांनी राज्यातील वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्री-पेड वीज मीटरबाबत विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, इलेक्ट्रॉनिक मीटर फिडरवर बसवण्यात आले आहेत. येत्या सहा महिन्यांत ते ट्रान्सफॉर्मरवर बसवण्यात येतील. त्यानंतर घरगुती मीटर बसवण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.