
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे हेलिकॉप्टर आज बूधवारी विदर्भाच्या ढगात काही काळ हरवल्याचे समोर आले. हेलिकॉप्टर ढगात भरकल्यानंतर पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॉप्टर जमीनीवर उतरवल्यामुळे पुढील मोठी दूर्घटना टळली आहे. याबाबात अजित पवारांनी भरसभेत किस्सा सांगताना माझ्या पोटात गोळा आला होता. मात्र देवेंद्र फडणवीस निवांत बोलत होते. यावेळी मंत्री उदय सामंत, पार्थ पवार हे सोबत होते.
यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टर प्रवासात काहीवेळा हेलकावे अनुभवले आहेत. आता, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रवास केल्यानंतर आलेला प्रवास अनुभव अजित पवारांनी सांगितला. गडचिरोली जिल्ह्याच्या वडलापेठ येथील सुरजागड इस्पात प्रा.लि. या कारखान्याचा भूमिपूजनासाठी दोघे एकाच हेलिकॉप्टरमधून पोहोचले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टरमध्ये असतांना आतापर्यंत सहा वेळा अपघात झाला आहे. मिरा भाईंदर येथे 11 जानेवारी 2018 मध्ये केबल अडकल्याने तर 9 डिसेंबर 2017 मध्ये नाशिक येथे क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याने हेलिकॉप्टरची इमरजन्सी लॅण्डिंग करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे 10 मे, 25 मे 2017 आणि 7 जुलै 2017 असे दोन महिन्यातच तीनदा अपघात झाले होते.