शिक्षक भरती घोटाळा, उपसंचालकांना अटक

नागपूरमध्ये 580 अपात्र शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्या प्रकरणी शिक्षण उपसंचालकांना अटक करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या शालार्थ प्रणालीमध्ये 580 अपात्र शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली. ही नावे 12 शिक्षण संस्थांच्या माध्यमातून घुसडण्यात आली आहेत. याप्रकरणी प्राथमिक विभागाचे वेतनविषयक अधीक्षक नीलेश वाघमारे यांना निलंबित केले असून आता नागपूर शिक्षण विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.