उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाहन उडवण्याची धमकी 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवून देण्याची ई-मेलद्वारे धमकी आली आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गुरुवारी सकाळी एक ई-मेल आला. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. हा मेल काही पोलीस ठाण्यांना प्राप्त झाला. गोरेगाव पोलिसांनादेखील तशाच प्रकारे ई-मेल आला. ई-मेल पाठवणाऱ्याचा आयपी अ‍ॅड्रेस पोलीस ट्रक करत आहेत. तो ई-मेल कोणी पाठवला आणि कुठून पाठवला याचा तपास सायबर पोलीस करीत आहेत.