अजितदादांची तब्येत बिघडली; कार्यक्रम रद्द

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घशाचे इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांनी आज दिवसभराचे कार्यक्रम रद्द केले. ते पुण्यातच भोसले नगर येथील निवासस्थानी थांबून राहिले. अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी औंध येथे आयटीआय संस्थेमध्ये प्रशिक्षणाचा कार्यक्रम होता, त्यानंतर उद्योजकांची बैठक आणि पत्रकार परिषद होणार होती. मात्र काल रात्री नाशिक दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांना घशाचे इन्फेक्शन झाले त्यामुळे त्यांनी हे कार्यक्रम रद्द केले.