देशभरातील बँकांमध्ये 78,213 कोटी रुपये पडून

500-rupee-note

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालामधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. देशभरातील विविध बँकांमध्ये हजारो कोटी रुपयांच्या ठेवी पडून आहेत, ज्यांच्यावर अद्याप कुणीही दावा केलेला नाही. बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवींमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च 2024 पर्यंत ही रक्कम 78,213 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 10 किंवा त्याहून अधिक वर्षांपासून खातेधारक किंवा त्याच्या कुटुंबातील कुणी दावा केला नाही.

या पैशांवर दावा कसा करायचा…
● सर्व बँकांना नावे आणि पत्त्यांसह निष्क्रिय खाती आणि दावा न केलेल्या खात्यांची यादी जारी करणे आवश्यक आहे. ● तुमचे नाव अशा कोणत्या यादीत असेल, तर ते जाणून घेण्यासाठी बँकेच्या वेबसाइटला भेट द्या. ● तुमचे किंवा नातेवाईकाचे नाव आढळल्यास, बँकेच्या जवळच्या शाखेला भेट देऊन या पैशांवर दावा करता येतो. ● केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाङ्गी आवश्यक कागदपत्रे सबमिट करावी लागतात. ● खातेदाराचा मृत्यू झाला असेल आणि नोंदणीपृत नॉमिनीचाही मृत्यू झाला असेल तर, उत्तराधिकार प्रमाणपत्र किंवा नोटरीपृत मृत्यू प्रमाणपत्राद्वारे रकमेवर दावा केला जाऊ शकतो.