दंतचिकित्सकांची संघटना हायकोर्टात

सौंदर्य आणि केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या दंतचिकित्सकांवर कारवाईची मागणी करीत त्वचारोग तज्ञांच्या संघटनेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत हस्तक्षेप करण्यासाठी ‘असोसिएशन ऑफ ओरल ऍण्ड मॅक्सिलोफेशियल सर्जन ऑफ इंडिया’ने अ‍ॅड. हरेकृष्णा मिश्रा आणि अ‍ॅड. अरुण मिश्रा यांच्या माध्यमातून अर्ज दाखल केला आहे.

‘डायनॅमिक डर्मेटोलॉजिस्ट अ‍ॅण्ड हेअर ट्रान्सप्लांट असोसिएशन’ने सखोल संशोधन न करताच दंतचिकित्सकांना केस प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात रोखण्याच्या वाईट हेतूने जनहित याचिका दाखल केली आहे. दंतवैद्यक परिषदेने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना जनहित याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे. त्यावर दंतचिकित्सकांच्या संघटनेने आक्षेप घेतला आहे. जनहित याचिकेत आम्हाला पक्षकार बनवावे, अशी विनंती ‘असोसिएशन ऑफ ओरल ऍण्ड मॅक्सिलोफेशियल सर्जन ऑफ इंडिया’ने केली आहे.