विनयभंग प्रकरणी डिलिव्हरी बॉय गजाआड

महिलेचा विनयभंग करून पळून गेलेल्या डिलिव्हरी बॉयला अखेर व्ही.पी. रोड पोलिसांनी अटक केली. शाहरुख शेख असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार महिला गिरगाव येथे राहतात. गेल्या महिन्यात त्यानी काही साहित्याची ऑर्डर केली होती. त्या ऑर्डरनंतर दोन वेळा त्याने महिलेला विचारणा केली. त्याला फोन करून पत्ता सांगितला होता. रात्री तो साहित्य घेऊन घरी आला. तेव्हा तिच्या घरात कोणी नसल्याचे त्याला वाटले. त्याने महिलेसमोर नकोसे कृत्य केले. याची माहिती महिलेने तिच्या पतीला सांगितली.

पतीने त्याला पकडून बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर तो पळून गेला होता. महिलेने याची माहिती पंपनीच्या कस्टमर केअरला पह्न करून दिली. महिलेच्या तक्रारीवरून कंपनीने शाहरुखला चौकशीसाठी बोलावले होते. मात्र तो चौकशीसाठी हजर राहिला नाही. महिलेने व्ही.पी. रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. शाहरुख हा गावदेवी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.