छावा चित्रपट सुरू असताना थिएटरमध्ये लागली आग, प्रेक्षकांमध्ये घबराट

सिलेक्ट सिटी मॉलमध्ये छावा चित्रपट सुरू असताना चित्रपटगृहात आग लागली. ही आग भडकल्याचे पाहून प्रेक्षकांमध्ये घबराट पसरली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. दिल्लीती साकेत परिसरातील सिलेक्ट सिटी मॉलमधील ही घटना आहे.

मॉलमधील चित्रपटगृहा आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली. दिल्ली अग्निशमन दलाने ही माहिती दिली आहे.

राजधानी दिल्लीतील सिलेक्ट सिटी मॉलमधील चित्रपटगृहात संध्याकाळी 5.44 आग लागली. यावेळी छावा चित्रपट दाखवण्यात येता होता. चित्रपटगृहात आग लागल्याची माहिती तातडीने दिल्ली पोलिसांना आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि तात्परने आग नियंत्रणात आणण्यात आली.

सिलेक्ट सिटी मॉलमध्ये ही आग पीव्हीआर ऑडी-3 च्या स्क्रिनमध्ये लागली होती. सुदैवाने या आगीत कुणालाही इजा झालेली नाही. सर्व प्रेक्षक सुरक्षित आहेत. चित्रपटगृहात फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे मोठी घटना टळली.