![karnail](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/karnail-696x447.jpg)
दिल्ली विधानसभा 2025 चे निकाल धक्कादायक लागले आहेत. या निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवले आहे. आप हा सर्वसामान्यांचा पक्ष अशी ओळख आहे. मात्र, आता निवडून आलेल्या आमदारांमध्ये काहीजण कोट्यधीश आहेत. त्यातील एक नवनिर्वाचीत आमदरा फक्त 10 वी पास असून त्याच्याकडे अमेरिकेत चार आलीशन घरे आहेत. दिल्लीत नवनिर्वाचित काही आमदार त्यांच्या प्रचंड संपत्तीमुळे चर्चेचा विषय ठरत आहेत.
दिल्ली विधानसभेच्या उमेदवारी अर्जामध्ये या आमदारांनी त्यांच्या संपत्तीची माहिती दिली आहे. दिल्लीतील नवनिर्वाचीत आमदारांमध्ये भाजपचे करनैल सिंह हे स्रावत श्रीमंत आमदार ठरले आहेत. त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती असल्याची माहिती आहे. तसेच अमेरिकेत त्यांची 4 आलीशान घरे आहेत. तसेच लाखोंची ज्वेलरी आहे. त्यांचे शिक्षण फक्त 10 वी पास एवढेच आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचीही चर्चा होत आहे.
करनैल सिंह यांनी आपच्या सत्येंद्र जैन यांच्यावर 18863 मतांनी विजय मिळवला आहे. शाकुर बस्ती मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत. प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार त्यांच्याकडे 259.67 कोटींची संपत्ती आहे. तसेच 1.32 लाख रुपये कॅश आहे. तर चल संपत्ती 92.36 लाख एवढी आहे. तर 258 कोटींची अचल संपत्ती आहे. हरयाणामध्ये त्यांचे 60 कोटींचे फार्महाऊस आहे. तसेच 55 लाखांचे सोनीपत येथे दुकान आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन आणि कॅलिफोर्नियासह येथील घरांसह एकून 4 आलीशान घरे आहेत. तर हसियाणा आणि सोनीपत येथील घरांची किंमत 198 कोटी आहे.
करनैल सिंह यांच्यासह भाजपच्या मनजिंगर सिंह सिरसा यांच्याकडे 248.95 कोटींची संपत्ती आहे. गुरुचरण सिंह यांच्याकडे 130.90 कोटींची संपत्ती आहे. तसेच परवेश वर्मा यांच्याकडे 95 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. अनेक निवनिर्वाचीत आमदार त्यांच्या संपत्तीमुळे चर्चेत आहेत.