दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केले. भाजपकडून खुलेआम गुंडगिरी सुरू असून दिल्ली पोलीसही भाजपचा प्रचार करत आहेत, असा दावा केजरीवाल यांनी केला.
दिल्ली पोलिसांना लोकांच्या सुरक्षेचे काहीही पडले नसून ते भाजपचे निवडणूक कॅम्पेन करत आहेत. दिल्ली पोलीस भाजपचा प्रचार करत असून आम आदमी पार्टीच्या निवडणूक मोहिमेत अडथळा आणणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पाठिंबा देत आहेत. भाजपचे कार्यकर्ते खुलेआम आपच्या स्वयंसेवकांना धमक्या देत आहेत, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.
<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”hi” dir=”ltr”>दिल्ली चुनाव में इनकी धोखाधड़ी से बात नहीं बनी तो अब बीजेपी खुलेआम गुंडागर्दी पर उतर आई है। <a
दिल्ली चुनाव में इनकी धोखाधड़ी से बात नहीं बनी तो अब बीजेपी खुलेआम गुंडागर्दी पर उतर आई है। https://t.co/4VPlkdzm16
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 22, 2025
भाजप निवडणूक प्रचारादरम्यान लोकांना पैसे आणि वस्तूचे वाटप करत आहे. मतांसाठी हा लाच देण्याचच प्रकार असून यामुळे लोकशाहीचे नुकसान होत आहे, असा दावाही केजरीवाल यांनी केला.
दिल्लीतील नागरिकांनी एकजुटीने भाजपला उत्तर द्यावे. भाजपचा दिल्लीत ऐतिहासिक पराभव अटळ आहे, असेही केजरीवाल यावेळी म्हणाले.
दरम्यान, दिल्लीमध्ये 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. गेल्यावेळी झालेल्या निवडणुकीत आपने 70 पैकी 62 जागा जिंकत बहुमत मिळवले होते.
धक्कादायक! प्रचाराच्या रणधुमाळीत दिल्लीत भयंकर घटना, केजरीवालांच्या ताफ्यावर भाजप समर्थकांचा हल्ला