मॅट्रिमोनी अॅपचा गैरवापर करून अनेकांची फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. येथे एका व्यक्तीने मॅट्रिमोनी अॅपचा वापर करून एक,दोन नव्हे तर 50 हून अधिक महिलांची फवणूक केली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मुकीम अय्यूब खान (38) असे त्या आरोपीचे नाव असून हा गुजरातमधील वडोदरा येथील कायमचा रहिवासी आहे. अय्युबचे 2014 मध्ये लग्न झाले होते आणि त्याला तीन मुले आहेत. असे असतानाही तो गेल्या चार वर्षांपासून विविध राज्यात फिरत होता. या राज्यात राहून तो लग्नाच्या नावाखाली महिला व मुलींची फसवणूक करत होता. त्याची पहिली शिकार गुजरातमधील वडोदरा येथील घटस्फोटित महिला होती. शादी डॉट कॉमवर प्रोफाइल तयार करून अय्युबने या नोकरदार महिलेला आपल्या जाळ्यात अडकवले होते.
अय्युबने आधी मॅट्रिमोनी साईटवर स्वत: च्य़ा नावाने लॉग ईन केले. त्याने त्याच्या प्रोफाइलमध्ये स्वत:ला सरकारी अधिकारी असल्याचे दाखवले होते. यासोबत त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला असून तो सिंगल असल्याचेही त्याने त्यात लिहिले होते. यानंतर महिलेशी संवाद साधताना त्याने महिलेला आणि त्य़ांच्या कुटुंबीयांना धीर दिला. त्याला फक्त आपल्या मुलीसाठी आई हवी असल्याचे त्यांने सांगितले. अशा स्थितीत महिलेच्या कुटुंबीयांवर अय्युबच्या बोलण्याचा प्रभाव पडला आणि त्यांनी आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावले.
2020 मध्ये अय्युबने आणखी एक बनावट प्रोफाइल तयार करून देशभरातील मुली आणि महिलांना अडकवण्यास सुरुवात केली. आधी तो मॅट्रिमोनिअल वेबसाईटद्वारे मुलींना आमिष दाखवून मोठमोठ्या गोष्टी करायचा, नंतर महिला आणि मुलींना इमोशनली ब्लॅकमेल करून पत्नी आणि मृत मुलीचे फोटो दाखवायचा. त्यामुळे महिला व मुली त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांच्याशी लग्न कराच्या. मग त्यांच्याकडून अय्युब पैसे उकळून फरार होत असे. अय्युब हा केवळ हायप्रोफाईल मुली आणि घटस्फोटित महिलांना टार्गेट करायचा.
अय्युबने अशाप्रकारे 50 हून अधिक महिला- मुलींना फसवले होते. त्यामुळे अनेक महिलांनी अय्युबविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. पोलिसांनी वडोदराहून दिल्लीला पोहोचलेल्या अय्युबला ट्रेनमधून अटक केली.