दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. बुधवारी केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने अतंरिम जामीन देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.
मुख्यमंत्री अरंविद केजरीवाल यांनी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याला आव्हान करत जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने सीबीआयला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.
केजरीवाल यांचे वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी अरविंद केजरीवाल यांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत, त्यामुळे या प्रकरणात लवकर सुनावणी घेण्यात यावी अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे, पुढील सुनावणी 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. या प्रकरणी मनिष सिसोदिया यांना देखील 17 महिन्यांनंतर जामीन मिळाला आहे.