
कथित मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँण्ड्रींग प्रकरणात तिहार तुरुंगात असलेल्या तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के कविता यांची मंगळवारी अचानक तब्येत बिघडली. त्यांना तिहार प्रशासनाने तत्काळ दिल्लीच्या डीडीयू रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र त्यांना रुग्णालयात का नेण्यात आले याबाबत स्पष्ट झालेले नाही.
कविता यांना ED ने 15 मार्च रोजी हैदराबाद येथील बंजारा हिल्स येथील निवासस्थानातून अटक केली होती. त्यानंतर त्यांना सीबीआयने तिहार तुरुंगातून अटक केली होती. हे प्रकरण 2021-22 च्या दिल्ली सरकारच्या मद्य धोरणाच्या निर्मितीमध्ये कथित भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे, जे नंतर दिल्ली सरकारने रद्द केले होते. तेलंगणाचे 46 वर्षीय राजकारणी के कविता सध्या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.