न्यायमूर्ती वर्मा यांच्या खटल्यांची नव्याने सुनावणी

दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी सुरू असलेल्या 50 हून अधिक प्रकरणांची नव्याने सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. दिवाणी रिट याचिकांसह 52 प्रकरणांची यादी सूचनेमध्ये आहे. ही प्रकरणे 2013 ते 2025 पर्यंतची आहेत. दरम्यान, 14 मार्च रोजी वर्मा यांच्यादिल्लीतील घराला लागलेल्या आगीत घराच्या स्टोअर रुममध्ये जळालेल्या 500 रुपयांच्या नोटा आढळल्या होत्या.