केजरीवाल यांच्या अटकेप्रकरणी दिल्ली हायकोर्टाची सीबीआयला नोटीस

कथित मद्यधोरण घोटाळाप्रकरणी सीबीआय कोठडीत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सीबीआयच्या अटकेला दिलेल्या आव्हान याचिकेवर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. सीबीआयने केलेली अटक बेकायदा असल्याचे केजरीवाल यांच्या वकिलांनी सांगितले. यावर दिल्ली हायकोर्टाने सीबीआयला नोटीस बजावली असून सात दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

याप्रकरणी आता 17 जुलैला पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, याच प्रकरणातील अन्य आरोपी बीआरएस नेत्या के कविता यांना जामीन देण्यास मात्र दिल्ली हायकोर्टाने नकार दिला.