मनीष सिसोदिया यांना काहीसा दिलासा; आठवड्यातून एकदा आजारी पत्नीला भेटता येणार

दिल्लीचे माजी उप-मुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून काहीसा दिलासा मिळाला आहे. मनीष सिसोदीया यांच्या जामिनावर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने निर्णय देताना म्हंटले की, ‘सिसोदिया आठवड्यातून एकदा आपल्या आजारी पत्नीला भेटू शकतात. त्या दरम्यान ते तुरुंगातच राहतील.’

उच्च न्यायालयाने दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणात मनीष सिसोदिया आरोपी आहेत. सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाने ईडी-सीबीआयकडूनही उत्तर मागितले आहे. आता पुढील सुनावणी 8 मे रोजी होणार आहे. मनीष सिसोदीया यांचा जामीन अर्ज राऊज एवेन्यू न्यायालयाने 30 एप्रिल रोजी फेटाळला होता. सिसोदिया यांना जामीन देण्याची ही योग्य वेळ नसल्याचे सांगत विशेष न्यायाधीशांनी दिलासा देण्यास नकार दिला होता. यानंतर सिसोदिया यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.

जामीन याचिकेसह एका अंतरिम अर्जात, सिसोदिया यांनी उच्च न्यायालयाला ट्रायल कोर्टाचा आदेश कायम ठेवण्यासाठी विनंती केली होती. आजारी पत्नीला आठवड्यातून एकदा भेटण्याची मागणी केली होती. तपास यंत्रणेला त्यांच्या पत्नीला भेटण्याबाबत काहीच अडचण नाही, असे ईडीचे वकील म्हणाले. त्यानंतर सिसोदीया त्यांच्या पत्नीला भेटू शकतात, असे  उच्च न्यायलयाने म्हटले आहे.