न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना न्यायदानास बंदी

शासकीय निवासस्थानी लागलेल्या आगीत जळालेल्या नोटांचे तब्बल 15 कोटी रुपयांचे घबाड सापडल्याच्या घटनेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना तत्काळ प्रभावाने कोणत्याही प्रकारचे कामकाज आणि सुनावणी करण्यास मनाई करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार याबाबतचे सर्क्युलर जारी केले.