Delhi Election Result – आप आणि भाजपमध्ये जबरदस्त लढत, भाजपची वाटचाल बहुमताकडे

दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्चा कलांमध्ये आप व भाजपमध्ये काँटे की टक्कर दिसून येत आहे. सध्या भाजप 41 जागांवर आघाडीवर आहे तर आप 27 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसला अवघ्या एका जागेवरच आघाडी मिळाली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत आहे. त्यामुळे अवघ्या देशाचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. आम आदमी पक्ष विजयाचा चौकार मारतो की दिल्लीवर 27 वर्षांनंतर भाजपच्या हाती सत्तेच्या चाव्या सोपवतात हे आज स्पष्ट होईल.