![Saurabh Bhardwaj](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Saurabh-Bhardwaj-696x447.jpg)
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. सगळ्याच एक्झिट पोलमध्ये दिल्लीत सत्तापालट होऊन भाजप सत्तेत येणार, असं भाकित वर्तवलं जात आहे. मात्र आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी एक्झिट पोल चुकीचे ठरतील आणि आप मोठ्या बहुमताने सत्तेत परतणार, असा विश्वास व्यक्त केला आहे.
एक्झिट पोलवर आपली प्रतिक्रिया देताना सौरभ भारद्वाज म्हणाले की, “आम्ही दिल्लीची ही चौथी निवडणूक लढवली आहे. 2013 आणि 2015 च्या एक्झिट पोलमध्ये आमचा पराभव होणार, असं भाकित केलं होतं. 2020 मध्येही आमच्या जागा कमी दाखवल्या गेल्या आणि 2025 च्या एक्झिट पोलमध्येही आमच्या जागा कमी दाखवल्या गेल्या. मात्र हे सर्व एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होणार आणि आप प्रचंड बहुमताने सत्तेत परतणार.”