दिल्ली विधानसा निवडणूक प्रतिष्ठेची ठरली असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष मतदारांना वेगवेगळी आमिषं देत आहेत. अशातच पटपडगंज येथून काँग्रेसचे उमेदवार अनिल चौधरी यांनी निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सोमवारी भाजप उमेद्वार रवींद्र नेगी यांच्या मतदारसंघात दारू आणि चिकन वाटल्याचा दावा केला आहे. शिवाय भाजप उमेदवार रवींद्र नेगी हे या वितरणात सहभागी असल्याचा त्यांनी आरोप करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
काँग्रेस नेते अनिल चौधरी यांनी एक्स वर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत मांसाने भरलेली प्लास्टिकची पिशवी दाखवली आहे. ज्यामध्ये मांस अनेक पॉलिथिन पिशव्यांमध्ये ठेवले जाते. पराभवाच्या भीतीने, भाजप आणि आम आदमी पक्ष दारू आणि चिकन वाटून लोकांची मते खरेदी करू इच्छितात, असे काँग्रेसने म्हटले आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत असून भाजप किंवा त्यांच्या उमेदवाराकडून कोणतेही विधान आलेले नाही.
#BIGBREAKING 🚨
पटपड़गंज में शराब और चिकन बांटते पकड़े गए भाजपा प्रत्याशी रविन्द्र नेगी लोग..हार के डर से बौखलाई भाजपा और आम आदमी पार्टी शराब-चिकन बांट कर जनता के वोट खरीदना चाहती है। pic.twitter.com/5uIfEOiY7s
— Indian Youth Congress (@IYC) February 3, 2025
रवींद्र नेगी हे दिल्लीतील पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. ते आम आदमी पक्षाचे अवध ओझा आणि काँग्रेसचे अनिल कुमार चौधरी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. दिल्लीत उद्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान होईल आणि 8 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सोमवार शेवटचा दिवस होता.