Delhi Earthquake – दिल्ली-NCR मध्ये पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के, लोकं घाबरून घराबाहेर धावली

देशाची राजधानी असलेल्या दिल्ली आणि एनसीआर परिसराला आज पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. पहाटे 5 वाजून 36 मिनिटांनी हा भूकंप झाला असून रिक्टर स्केलवर या भूकंपाची तिव्रता 4.3 इतकी नोंदवण्यात आली आहे. साखर झोपेत असलेल्या भूकंपाच्या धक्क्याने घाबरून घराबाहेर धाव घेतली. त्यानंतर दिल्लीतील अनेक भागांमध्ये लोक घाबरून घराबाहेर, इमारतींखाली रस्त्यावर उभे असल्याचं व्हिडीओ समोर आले आहेत.

यावेळी भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी दिल्लीजवळच असल्याने अनेक वेळ जमीन हालत होती. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्रामसह विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्रबिंदू दिल्लीच्या आसपास जमिनीपासून 5 किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दिल्लीला जोरदार धक्के जाणवले.

भूकंपानंतर दिल्ली पोलिसांनी 112 हा हेल्पलाइन नंबर देखील जारी केला आहे. भूकंपाचे धक्के तीव्र असले तरी, अद्याप कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.