नवऱ्याचे समलैंगिकतेचे बिंग फुटले, पत्नीची हत्या करत बेडमध्ये कोंबले; दिल्ली हत्याकांडात मोठा खुलासा

दिल्लीत एका घरामध्ये बेडच्या बॉक्समध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी घरमालकाला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पतीनेच मित्र आणि घरमालकासोबत मिळून पत्नीची हत्या केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. यानंतर पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. मात्र महिलेचा पती अद्याप फरार आहे.

असा झाला हत्येचा उलगडा

घरामधून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दार उघडून पाहिले असता बेडमध्ये महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

पोलीस चौकशीत फ्लॅट मालक घरी आल्याचे कळले. पोलिसांनी घरमलाक विवेकानंद मिश्रा याला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली. चौकशीत मिश्राने गुन्ह्याची कबुली दिली. महिलेचा पती, त्याचा मित्र आणि घरमालकानेच महिलेची हत्या केल्याचे निष्पन्न झाले.

महिलेने पतीला त्याचा मित्र आणि घरमालकासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. यानंतर महिला घर सोडून पंजाबला माहेरी गेली. पतीने तिची कशीबशी समजूत काढून तिला परत दिल्लीला आपल्या घरी बोलावले. यानंतर पती, त्याचा मित्र आणि घरमालक तिघांनी मिळून तिची हत्या केली आणि मृतदेह बेडच्या बॉक्समध्ये ठेवून तिघे फरार झाले. तिघेही मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत होते. मात्र तत्पूर्वीच मृतदेहाला दुर्गंधी सुटली आणि हत्याकांडाचा उलगडा झाला.