दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून भाजप आणि आपमध्ये प्रमुख लढत आहे. जनतेचा आपला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आपच्या आर्थिक मदतीच्या आवाहनानंतर जनतेने अवघ्या चार तासात आपला 10 लाखांचा निधी मिळवून दिला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी रविवारी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी लोकांकडे मदतीचे आवाहन केले होते. निवडणूक लढवण्यासाठी आपल्या पक्षाला क्राउड फंडिंगची आवश्यकता आहे. पक्षाला एकूण 40 लाख रुपये हवे आहेत, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या आवाहनानंतर अवघ्या चार तासांतच जनतेने त्यांना 10,32,000 रुपयांची देणगी दिली आहे.
आपला 176 देणगीदारांकडून आतापर्यंत 10,32,000 रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यांना मिळणाऱ्या या मदतीचा ओघ बघता, काही तासांतच 40 लाख रुपयांचा निधी त्यांना मिळण्याच अंदाज आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या होत्या की, निवडणूक लढवण्यासाठी आपल्या पक्षाला 40 लाख रुपयांची आवश्यकता आहे. यासाठी आपण आम्हाला 100 ते 1000 रुपयांपर्यंतची मदत करू शकतात. यामुळे निवडणूक लढण्यास मदत होईल. आपण कोणत्याही उद्योगपतींकडे मत नमागत नसून आपल्याला पाठिंबा देणाऱ्या जनतेची मदत मागत असल्याचे आतिशी म्हणाल्या. यापूर्वीही दिल्लीच्या जनतेने आपला पाठिंबा दिला आहे. लोकांच्या छोट्या छोट्या सहकार्याने आम्हाला निवडणूक लढवण्यास आणि जिंकण्यास मदत झाली आहे. दिल्लीच नव्हे तर, देशभरातून लोकांनी आपल्याला मदत केली आहे, असेही आतिशी यांनी म्हटले होते.
दिल्लीतील 70 विधानसभा जागांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत. याआधीच्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत आपने जबरदस्त विजय मिळवला होता. आता जनतेने 4 तासात आपला 10 लाख मिळवून दिले. त्यामुळे जनतेचे आपला समर्थन असल्याचे दिसून येत आहे.