आतिशी यांना अटक करण्याचे ‘वरून’ आदेश

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना कोणत्या तरी खोटय़ा प्रकरणात गोवून अटक करण्याचे आदेश भाजपने तपास यंत्रणांना दिले आहेत, असा गंभीर आरोप आपचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी आज केला. ते म्हणाले, आम्हाला सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की, ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग या तिन्ही तपास यंत्रणांची बैठक झाली. कुठल्याही खोटय़ा तक्रारी दाखल करून आतिशी यांना अटक करा, असे ‘वरून’ आदेश आल्याचे या बैठकीत सांगितले गेले. याशिवाय आपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या घरांवरही काही दिवसांत धाडी टाकण्याची योजना असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला.