
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज पहिल्यांदाच दिल्लीचा तब्बल एक लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. महिला समृद्धी योजनेसाठी 5100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून दिल्लीत महिलांना दरमहा अडीच हजार रुपये देण्यात येणार आहे. यमुना स्वच्छ करण्यासाठी 9 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण होणाऱ्या 1200 मुलांना मोफत लॅपटॉप देण्यात येणार आहेत.