दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 29 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. नवी दिल्लीतून आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात प्रवेश वर्मा, तर कालकाजी मतदारसंघातून मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्याविरोधात भाजपने रमेश बिधूडी यांना मैदानात उतरवले आहे. भाजपने यावेळी 16 उमेदवार बदलले असून 13 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे.