दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाची तुलना कुंभकर्णाशी केली आहे. रामायणात लिहिले आहे की, कुंभकर्ण सहा महिने झोपायचा आणि सहा महिने जागा रहायचा. पण, निवडणूक आयोगाला जागच येत नाही, असा हल्ला केजरीवाल यांनी निवडणूक आयोगावर केला. येत्या 5 फेब्रुवारीला दिल्लीत विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत प्रचाराचा सुपरसंडे गाजला.