गुरुद्वारातील ग्रंथी आणि पुजार्‍यांना दरमहा मिळणार 18 हजार रुपये, दिल्लीत केजरीवालांची मोठी घोषणा

आम आदमी पक्षाने 2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी पुजारी आणि गुरुद्वारातील ग्रंथी सन्मान योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत दिल्लीतील सर्व पुजारी आणि ग्रंथींना दरमहा 18 हजार रुपये दिले जातील. या योजनेअंतर्गत मंगळवारपासून (31 डिसेंबर) अर्ज करता येणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी आम आदमी पक्षाची ही तिसरी मोठी योजना आहे. याआधी आप अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजना जाहीर केल्या होत्या.

महिला सन्मान योजनेअंतर्गत दिल्लीतील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पात्र महिलांना दरमहा 1000 रुपये दिले जातील. तसेच 2025 मध्ये आपची सरकार स्थापन झाल्यास ही रक्कम 2100 रुपये केली जाईलमी, असं पक्षाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

याशिवाय संजीवनी योजनेअंतर्गत दिल्लीतील 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले होते की, ते दुपारी 12 वाजता एक मोठी घोषणा करतील, ज्यामुळे दिल्लीतील लोकांना खूप आनंद होईल. यानंतर त्यांनी या योजनेची घोषणा केली आहे.

दरम्यान, दिल्लीत नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणुका होऊ शकतात. अशातचआम आदमी पक्ष आतापासूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. दिल्लीतील सर्व 70 जागांसाठी आम आदमी पक्षाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.