धुळीमुळे दिल्लीत 50 विमानांना विलंब

दिल्ली विमानतळावर शुक्रवारी संध्याकाळपासून आज सकाळपर्यंत धुळीचे साम्राज्य असल्यामुळे 50 हून अधिक विमानांना विलंब झाला. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चालणाऱया देशांतर्गत उड्डाणांना प्रतिकूल हवामानामुळे उशीर झाला. 25 उड्डाणे इतरत्र वळवण्यात आली आणि धुळीमुळे सात उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. वळवण्यात आलेल्या विमानांना दिल्लीत पोहोचण्यास वेळ लागल्याने विमानतळावर गर्दी झाली. दिल्ली विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षात गर्दी असल्याने उड्डाणांना विलंब झाल्याचे विमान कंपन्यांनी सांगितले.