आपले सरकार पोर्टवरील सेवा देताना दिरंगाई केल्यास विभागप्रमुखांना भरावा लागेल दंड, वाचा सविस्तर

सर्वसामान्यांना शासकीय सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात आणि सरकारी कार्यालयातील अडचणींच्या तक्रारी नोंदवता याव्यात यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टल आणि मोबाईल अॅप सरकारने सुरू केले आहे. मात्र या पोर्टलवरून सेवा देताना किंवा तक्रारी सोडवताना प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दिरंगाई होत असते. त्यामुळे आता ‘आपले सरकार’ पोर्टलवरील अधिसूचित सेवांमध्ये विलंब करणाऱ्या प्रशासकीय विभागप्रमुखांवर प्रतिदिन 1 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत. सेवा हक्क कायद्यांतर्गत 1027 सेवांचे अधिसूचन केले असून त्यातील 527 सेवा या पोर्टलवर उपलब्ध आहेत.