
सध्याच्या घडीला बाॅलिवूड कलाकारांकडून ऑस्कर पुरस्कारांबद्दल उघडपणे रोष व्यक्त होताना दिसत आहे. यातच आता दीपिकानेही ऑस्कर पुरस्कारांबद्दल उघडपणे रोष व्यक्त केला आहे. दीपिकाच्या मते, जे हिंदुस्थानी चित्रपट ऑस्करला पात्र होते, त्यांना मात्र पहिल्याच फेरीतून बाद व्हावे लागले होते. यामध्ये तिने ‘लापता लेडिज’ या चित्रपटाचा उल्लेख केला आहे. ऑस्कर पुरस्कारांबद्दल वेळोवेळी बाॅलिवूडच्या कलाकारांनी आपले मत व्यक्त केलेले आहे. अनेकदा चांगल्या चित्रपटांवर झालेल्या अन्यायामुळे कित्येक चित्रपट ऑस्कर पहिल्या फेरीपर्यंत सुद्धा पोहोचले नाही.
दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये, अभिनेत्री लुई व्हिटॉन शोसाठी तयारी करताना दिसत आहे. या ब्रँडने अॅम्बेसेडर म्हणून निवडलेली दीपिका ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे. व्हिडिओमध्ये, दीपिका तयारी करताना बोलत आहे. यावेळी, ती ऑस्कर पुरस्कारांवर रोष व्यक्त करताना दिसली आहे. ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नातू नातू’ या गाण्याला ऑस्कर मिळाला तो क्षणही २०२३ चा क्षण आठवण दीपिका यावेळी चांगलीच भावनिक झाली होती.
व्हिडिओमध्ये पुढे दीपिका स्पष्टपणे म्हणाली की ऑस्कर पुरस्कारांसाठी अनेक भारतीय चित्रपटांची योग्य ती दखल घेतली नाही. मनातील वेदनेला वाट करत ती म्हणाली, “भारताकडून ऑस्कर पुरस्कार अनेक वेळा हिसकावून घेण्यात आला. असे अनेक चित्रपट होते जे पुरस्कारासाठी पात्र होते. पण त्यांना मात्र पहिल्याही फेरीत स्थान मिळाले नाही.”
View this post on Instagram
व्हिडिओच्या अगदी सुरुवातीला, दीपिका पदुकोणने अभिनेता एड्रियन ब्रॉडीला ऑस्कर मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. एड्रियन ब्रॉडीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यावर तिला खूप आनंद झाला होता. ‘द ब्रुटालिस्ट’ चित्रपटासाठी एड्रियनला ऑस्कर देण्यात आला.