बॉलीवूडचे स्टार कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह आई-बाबा झाले आहेत. रविवारी या जोडप्याला कन्यारत्न प्राप्त झाले असून त्यांनीच सोशल मीडियावर पोस्ट करत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. चाहत्यांपासून ते बॉलीवूडच्या कलाकारांपर्यंत सर्वांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दीपिकाला शनिवारी मुंबईतील एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिला. वेलकम बेबी गर्ल अशी पोस्ट शेअर करत दीपिका आणि रणवीरने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. ही आनंदाची बातमी समोर येताच दीपिका आणि रणवीरच्या कुटुंबीयांच्या तसेच त्यांच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. काही चाहत्यांनी तर दीपिका आणि रणवीरच्या नावातील अक्षर जुळवून बाळासाठी नाव देखील सुचवले आहे.