लंडन फेशियल प्लॅस्टिक सर्जरी सेंटरने जगातील सर्वात सुंदर महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात सुंदर महिलेचा किताब ब्रिटिश अभिनेत्री जोडी कॉमरला मिळाला आहे. तिला 94.52 टक्के गुण मिळाले आहेत. या यादीत झेंडाया (94.52 टक्के), बेला हदीद (94.44 टक्के), बेयॉन्से (92.44 टक्के) आणि एरियाना ग्रांडे (91.81 टक्के) यांचा समावेश आहे. तर हिंदुस्थानमधील एकमेव महिला आणि बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा समावेश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुरुषांमध्ये बॉलीवूड किंग शाहरुख खानचा समावेश आहे. हे दोघेही टॉप 10 मध्ये पोहोचले आहेत. गोल्डन रेशोच्या माध्यमातून ही यादी तयार केल्याचा दावा संशोधनात करण्यात आला आहे. जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत दीपिकाने 91.22 टक्के गुण मिळवून नववे स्थान पटकावले आहे. शाहरुख खानला 86.76 टक्के गुण मिळाले असून तो दहाव्या स्थानावर आहे.